पुणे : Weather Update: बंगालच्या उपसागरातील वादळी (Mandous Cyclone) प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाला (Rainfall) पोषक वातावरण झाले आहे तसेच ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता.१३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तविली गेली आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी – अधिक होत आहे तसेच राजस्थानमधील चूरू येथे सोमवारी (ता. १२) देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड आणि धुळ्यात पारा ११ अंशांवर पोचला आहे आणि उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २४ अंशांच्या दरम्यान होत आहे.
हे हि वाचा : शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय
उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आणि आज (ता. १३) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.
अरबी समुद्रात आज कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि ही प्रणाली अरबी समुद्रात येताच आज (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिम दिशेकडे किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे.Weather Update
1 thought on “Weather Update : मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता 2022”